Chandrapur News: चंद्रपूरच्या अनुजाचा 'सकल कुंभार समाजा'कडून गौरव; मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य मेळावा संपन्न!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल, 'सकल कुंभार समाज विकास परिषद, महाराष्ट्र प्रदेश' यांच्या वतीने आयोजित भव्य मेळाव्यात अनुजा सतीश तायडे नगरसेविका महानगरपालिका चंद्रपूर यांचा विशेष गौरव करण्यात आला. वर्धा येथे पार पडलेल्या या सोहळ्यात राजकारणातील अनेक दिग्गज मंडळींची उपस्थिती होती.


सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या वतीने समाजाचे संघटन आणि गुणवंतांचा सत्कार करण्यासाठी एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भूषवले, तर उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवून समाजाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दलअनुजा सतीश तायडे नगरसेविका महानगरपालिका चंद्रपूर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.