OBC Mahamorcha: ओबीसी जनगणना व आरक्षण निर्णयाविरोधात महामोर्चा

Bhairav Diwase
रविवारी निघणार चंद्रपुरात महा मोर्चा
चंद्रपूर:- केंद्र शासनाने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी तसेच महाराष्ट्र शासनाने १४ मे २०२६ रोजी आरक्षणासंदर्भातील घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी चंद्रपुरात २८ जून रोजी संयुक्त महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विविध सामाजिक संघटना, संस्था आणि घटकांच्या वतीने हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. रविवारी दुपारी १२ वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार माहिती राष्ट्रीय असल्याची सचिन अन्य ओबीसी महासंघाचे महासचिव राजूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश चोखारे, नगरसेवक पप्पू देशमुख, स्थायी समिती सभापती मनस्वी गि-हे, आरपीआयचे (खो) चे बाळू खोब्रागडे, धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष संजय ढवस, शिवसेनेचे जयदीप रोडे, प्रा. रवींद्र झाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्यांची यावेळी उपस्थित होती.


केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२५ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अधिसूचनाही जारी करण्यात आली. मात्र, अलीकडे झालेल्या घरगुती गणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद न झाल्याने समाजामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र व स्पष्ट नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.