BJP corporator : भाजप नगरसेवक सूरज पांडे यांची तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार

Bhairav Diwase
चंद्रपूर:- गडचांदूर नगरपरिषदेतील भाजप नगरसेवक सूरज पांडे यांच्यावर प्रशासनाकडून मोठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांनी २४ ऑगस्ट रोजी हे आदेश पारित करत पांडे यांना तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.


सूरज पांडे यांच्यावर जुगार, मारहाण, सरकारी कामात अडथळा, अवैध साहूकारी आणि विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यांसह तब्बल ९ ते १० गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गडचांदूर शहरातील शांतता कायम राहावी आणि भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, एका लोकप्रतिनिधीवरच अशा प्रकारची हद्दपारीची कारवाई झाल्यामुळे गडचांदूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.