Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्याला लाभले परिविक्षाधीन IPS अधिकारी

Bhairav Diwase
कुमार सुशांत सांभाळणार राजुरा SDPO कार्यालयाची धुरा!
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याला परिविक्षाधीन आयपीएस (IPS) अधिकारी लाभले आहेत. कुमार सुशांत यांची चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, आगामी ३१ ऑगस्ट २०२६ पासून ते आपल्या क्षेत्रिय प्रशिक्षणासाठी राजुरा येथे रुजू होत आहेत.


हैदराबाद येथील प्रतिष्ठित 'सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी' (SVPNPA) येथील कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर कुमार सुशांत राजुरा येथे पदभार स्वीकारणार आहेत.


मूळचे बिहार राज्याचे निवासी असलेले कुमार सुशांत यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर UPSC च्या २०२२ च्या नागरी सेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवले होते. त्यांनी संपूर्ण भारतात १२२ वा क्रमांक (AIR 122) पटकावत भारतीय पोलीस सेवेत आपले स्थान निश्चित केले होते. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल देशभरातून त्यांचे कौतुक करण्यात आले होते.


राजुरा उपविभागात कुमार सुशांत यांच्या रूपाने एक ऊर्जावान व अभ्यासू अधिकारी मिळाल्यामुळे परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मोठी मदत होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.