मुंबई:- महाराष्ट्राच्या पोलीस दलात १२ नवे आयपीएस अधिकारी रुजू होणार आहेत. गृह विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आली आहे. हैदराबाद येथील सरकार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. हे परिविक्षाधीन अधिकारी महाराष्ट्र संवर्गात ३१ ऑगस्टपासून रुजू होणार आहेत.
राज्याच्या गृह विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. हे अधिकारी उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. एकूण १२ अधिकाऱ्यांमध्ये पाच महिला अधिकारी आहेत. त्यांची रत्नागिरी, यवतमाळ, चंद्रपूर, लातूर, परभणी, वर्धा, गडचिरोली, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
पदस्थापना मिळालेल्या १२ अधिकाऱ्यांपैकी ६ अधिकारी २०२३ च्या तुकडीचे आणि ६ आयपीएस अधिकारी २०२४ च्या तुकडीचे आहेत. त्यांचे संस्थात्मक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता ते महाराष्ट्र संवर्गात रुजू होतील.
परिविक्षाधीन अधिकारी व त्यांची पदस्थापना -
अरांक्षा यादव - रत्नागिरी
गुरव गंगाधर कायांदे पाटील - उमरखेड (यवतमाळ)
कुमार सुशांत - राजूरा (चंद्रपूर)
मेघना आय. एन. - लातूर (ग्रामीण)
राहुल कुमार - परभणी शहर
राहुल रमेश आत्राम - आर्वी (वर्धा)
सागर संजय भामरे - भामरागड (गडचिरोली)
ईशानी आनंद - अचलपूर (अमरावती)
जान्हवी बाळासाहेब शेखर - गंगापूर (छत्रपती संभाजीनगर)
सारदा तेजस सुदिप - भंडारा
शशांत एन. एम. - कामठी (नागपूर ग्रामीण)
सुयश कुमार सिंग - धानोरा (गडचिरोली)
