घुग्घुस पोलिसांनी केली आरोपीस अटक.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- शनिवारीला रात्री ९:३० वाजता फिर्याद सुरेंद्र झाडे (३१) रा.म्हातारदेवी हा आपल्या मित्रांसोबत घरा समोर बोलत असतांना आरोपी विनोद राजुरकर (४५) रा. म्हातारदेवी याने पुर्ववैस्मन्यातुन चाकुने सुरेंद्र झाडेच्या गळ्यावर वार केला हे बघुन मध्यस्थी करण्यासाठी गेलेला अविनाश भोंगळे याच्या बरगडीवर चाकुने वार केला.
जखमी अवस्थेत दोघांना ही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तक्रारी वरुन घुग्घुस पोलिसांनी कलम ३०७ गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पो.नि.राहुल गांगुर्डे यांचा मार्गदर्शनात सह.पो.नि. विरसेन चहांदे करीत आहे.