Top News

IPL येताच चंद्रपुरातील इंदिरा नगर परिसरात सट्टेबाजीला ऊत.

🟥पान टपरी सह चौकाचौकांत सट्टेबाजांचे घोळके.

 🟪या चौकातील कोंबडा बाजार चर्चेचा विषय.
 
🟨स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष.
Bhairav Diwase. Oct 16, 2020
चंद्रपूर:- आयपीएल येताच चंद्रपुरातील इंदिरा नगर परिसरात सट्टेबाजीला ऊत आला आहे. जवळपास दरदिवशी लाखोंची उलाढाल सुरू आहे. विद्यार्थी, नवतरुणांपासून तर बरेच प्रतिष्ठित लोक यात उद्‌ध्वस्त होत आहेत. सर्वच वयोगटातील लोक यात आहेत, परंतु तरुणाई मात्र अधिक प्रमाणात आहे. इंदिरा नगरात सट्टा जोरात असून इथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रामनगर पोलिसांना वारंवार फोन करून माहिती दिली आजवर एकही पोलिस कारवाई झाली नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा:- दहाच्या नोटेवर पाठविला प्रियसीने प्रियकराला घरून पळून नेण्याचा दिला संदेश. http://www.adharnewsnetwork.com/2020/10/blog-post_536.html?m=1


इंदिरा नगर परिसरातील काही पानटपरी समोर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असते. हेच पान टपरी वाले सट्टा खेळताना दिसून येते. बेटिंगला भारतात कायदेशीररीत्या बंदी आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून देशभरातच बेटिंगचे जळे पसरले आहे. त्यामुळे क्रिकेट हा सभ्य मंडळींचा खेळ न राहता सट्टेबाजांचा खेळ झाला आहे. स्मार्ट फोन व इंटरनेट आल्यापासून चौका चौकात बुकी तयार झाले आहेत मॅच सुरू होण्याआधी टॉस लावण्याकरिता इंदिरानगर येथील सावित्रीबाई फुले चौक ते हनुमान मंदिरा पर्यंत चौकाचौकांत सट्टेबाजांचे घोळके आढळतात. काही तरुणांमध्ये तर बेटींगचे व्यसन इतके वाढले की आयपीएल नसले तरीही वर्षभर बेटींगसाठी संधी शोधून पैजा लावताना दिसतात.

हेही वाचा:- ग्रामपंचायत फुटाणा यांनी काढलेल्या झाडांच्या लिलावास ग्रामस्थांचा विरोध. http://www.adharnewsnetwork.com/2020/10/blog-post_562.html?m=1

अगदी ल्युडो या खेळातदेखील हजारोंची बेटींग करून तलफ भागवतात. पैसे नसल्यास मोबाईल फोन, दुचाकीची सर्रास पैज लावली जात असते. चंद्रपुरातील इंदिरा नगर मध्ये तर मोठ्या संख्येत तरुण मंडळी सटोरी म्हणून विख्यात आहेत. आयपीएलचा हंगाम तर या सर्व सटोरींकरिता पर्वणीच ठरत आहे, तर ऑनलाइन बेटींगमधील कमिशनच्या कमाईच्या लालसेने चांगली-चांगली तरुण मंडळी बुकींच्या व्यवसायाकडे ओढले जात आहे. या प्रकाराकडे अशीच डोळेझाक झाल्यास आत्महत्या,चोऱ्या, टोळीयुद्ध, गुंडगिरीचे प्रकार वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वेळीच यावर प्रशासनाने आवर घालून हा प्रकार बंद व्हावा, यासाठी व्यापक कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा:- काल चिंचोली येथील शेतकऱ्यांचा विद्युत करंट लागुन जागीच मृत्यु.  http://www.adharnewsnetwork.com/2020/10/blog-post_749.html?m=1


🔰प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची गरज...

सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीवरून रणकंदन माजले आहे. दारू किंवा तंबाखूसारख्या व्यसनांनीच संसार उद्‌ध्वस्त होतात, असेच ठसविण्यात येत आहे. हे खरे असले, तरी त्यासोबत चरस, गांजा, ड्रग्सची व्यसनेही वाढत आहेत. शिवाय कोंबडबाजार, सट्टेबाजी, पत्त्यांचा जुगार ही देखील एक नशाच आहे. त्याचेही अनेकांना व्यसन जडते आणि त्यांच्यासोबत त्यांचे आयुष्य व परिवारही उद्‌ध्वस्त होतो. त्यामुळे दारूबंदी किंवा तंबाखूसारख्या व्यसनांबद्दल चर्चा करताना या समस्यांचाही ऊहापोह होणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा:- दारूबंदीच्या समर्थनार्थ ग्रामस्थांची वज्रमूठ; बंदी तर हवीच ती अधिक मजबूत करा. http://www.adharnewsnetwork.com/2020/10/blog-post_575.html?m=1


🐓कोंबडा बाजारावर कारवाई होणार का ?

इंदिरा नगरातील एका चौकामध्ये मोठ्या प्रमाणात रविवार व बुधवार ला कोंबड्याचे पाळ करताना दिसून येते पाळ झाल्या नंतर इंदिरानगरातील दर्ग्याच्या बाजूला असलेल्या खुल्या मैदाना मध्ये पैशाची होळ लावून झगडवले जातात रामनगर पोलीसाना व रामनगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला त्याची माहिती काही लोकांनी फोनद्वारे दिल्ली परंतु पोलिस प्रशासन याच्याकडे पाठ फिरवली आहे. आता जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षकांनी यात स्वतः लक्ष घालावे व कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने