विष प्राशन करून युवा शेतकऱ्याची आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील युवा शेतकऱ्याने यांनी आज (दि. २९) दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली. मंगेश भिवसन गायकवाड (३४ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
मंगेश गायकवाड मागील काही वर्षापासून पांढरपौणी येथील वडिलोपार्जित शेती करीत होता. सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून आज दुपारी २ वाजता च्या सुमारास शेतातून घरी परतल्यानंतर घरीच विष प्राशन केले. घटना लक्षात येताच कुटूंबीयांनी त्याला उपचारार्थ चंद्रपूर येथे नेले परंतु उपचारादरम्यान आज सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील, भाऊ, पत्नी आणि एक मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे.
.
युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केला जात आहे.   #Farmersuicide #rajuranews #chandrapur