Top News

गोंडवाना विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा. #Gondwanauniversity


विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या विविध शुल्कामध्ये कपात.

(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे
गडचिरोली:- वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून विद्यार्थी महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष शिक्षण घेण्याकरीता येवू शकले नाही. सदरच्या काळात अनेक पालकांना निर्माण झालेल्या आर्थीक समस्या लक्षात घेता विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या विविध शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषदेने घेतलेला आहे.

येत्या शैक्षणिक सत्र 2021-22 करीता इंद्रधनुष्य, आव्हान, अविष्कार, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी वैद्यकीय मदत शुल्क, विद्यार्थी संघ शुल्क, वैद्यकीय तपासणी अर्ज शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क १०० टक्के माफ करण्यात आले असून ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, व पर्यावरण शुल्क यामध्ये ५० टक्के फी सवलत देण्याचा निर्णय विद्यापीठाव्दारे घेण्यात आलेला आहे.


सोबतच उन्हाळी २०२० परीक्षेकरीता सर्व नियमित विद्यार्थ्याकरीता सरसकट १० टक्के फी कपात करण्याचा निर्णय सुध्दा मा. व्यवस्थापन परिषदेने घेतलेला आहे. सदर निर्णयाचे सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असे आव्हान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी व प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी केले आहे . तसेच याबाबत सर्व महाविद्यालयांना परिपत्रकाव्दारे विद्यापीठाने कळविलेले आहे.

#Gondwanauniversity # Gadchiroli #Gadchiroli news #Chandrapur #collegefee #chandrapurnews

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने