अल्पवयिन मुलीचे लग्न लाऊन देणा-या ४ आरोपींना अटक. #Minorgirl

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- अल्पवयिन मुलीचे जबरदस्तीने लग्न लाऊन देणा-या एका आईला चांगलेच महागात पडले असून सध्या ती फरार असून ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नागमंदीर वार्डातील एका अल्पवयिन मुलीचे तिची आई आणि इतर काही लोकांनी संगनमत करुन तिचे मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील बनसोडा गावातील विक्रम अहिरवार या २५ वर्षीय युवकासोबत दि.१९ एप्रिल रोजी जबरदस्तीने लाऊन दिले. याबाबत मुलीच्या बहिणीने दि.३ मे रोजी भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली. 
त्यानुसार भद्रावती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी गुन्हा दाखल करुन तपास हाती घेतला. स्वत: सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप यांनी निकेश ढेंगे, विश्वनाथ चुधरी, इंदिरा शास्त्रकाल या पोलिस कर्मचा-यांसह मध्यप्रदेशातील बनसोडा या गावात जाऊन मुलीसोबत लग्न करणारा विक्रम अहिरवार आणि लग्न लाऊन देणारा अरविंद मालविय (२७) यांना ताब्यात घेऊन दि.२८ जून रोजी अटक केली. तसेच येथील भंगाराम वार्डातील बसंती सांडे(५०) व सविता अवसारे(४४) यांना दि.२९ जून रोजी अटक केली. तर अल्पवयिन मुलीची आई फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.
आरोपींविरुद्ध भा.दं.वि.३७६, ३७०, ३६६, ३६३, पोक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरोरा पोलिस स्टेशनच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव करीत आहेत.