Murder News: आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांची घरात घुसून हत्या

Bhairav Diwase

बिजापूर:- छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातून नक्षलवाद्यांच्या भ्याड कृत्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांची नक्षलवाद्यांनी घरात घुसून निर्घृण हत्या केली आहे.

छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा क्रूरता दाखवली आहे. त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या तीन नातेवाईकांची हत्या केली आहे. त्याचबरोबर 7 जणांना बेदम मारहाण केली आहे. याशिवाय नक्षलवाद्यांनी 12 हून अधिक गावकऱ्यांना ओलीस ठेवले आहे. नक्षलवाद्यांच्या या भ्याड कृत्यामुळे गावातील इतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नक्षलवादी नेता दिनेश मोडियम याने नुकतेच आत्मसमर्पण केले होते. त्याच्याच नातेवाईकांना नक्षलवाद्यांनी लक्ष्य करत त्यांना घरात घुसून गोळ्या घातल्या आहेत. यामाने नक्षलवादी नेता वेल्ला असल्याचे सांगितले जात आहे. विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी याची माहिती दिली आहे. शिवाय घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

झिंगू मोडियम, सोमा मोडियम आणि अनिल माडवी अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय, नक्षलवाद्यांनी 7 गावकऱ्यांनाही बेदम मारहाण करून जखमी केले आहे. याशिवाय नक्षलवाद्यांनी सुमारे एक डझन ग्रामस्थांचे अपहरण केल्याचे सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी मारलेले दोन गावकरी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेता दिनेश मोडियमचे नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता नक्षलवादी नेता वेल्ला आणि त्याच्या टीमने हा हल्ला घडवून आणला आहे.