Join Shivsena : माजी उपाध्यक्षांसह 11 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Bhairav Diwase

भद्रावती:- भद्रावती नगरपालिकेतील माजी उपाध्यक्षांसह एकूण 11 माजी नगरसेवकांनी आज मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश अत्यंत जल्लोषात पार पडला असून, या घटनेमुळे भद्रावतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

🌄
या पक्षप्रवेशात चंद्रपूर-वणी-अर्णी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना लोकसभा संघटक मा. मुकेशभाऊ जीवतोडे यांची प्रमुख भूमिका राहिली. त्यांच्या नेतृत्वात भद्रावतीमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

🌄
तसेच वरोरा नगरपालिकेचे 4 माजी नगरसेवकही लवकरच शिंदे गटात सामील होणार असून, त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. या घडामोडींमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होत असून, आगामी स्थानिक व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आधार न्युज नेटवर्क/ जितेंद्र माहूरे, भद्रावती