जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार 10 जुलै रोजी चंद्रपूर दौऱ्यावर.

Bhairav Diwase
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 10 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर.
Bhairav Diwase.    July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपुर:- महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 10 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

सकाळी 10:30 वाजता नियोजन भवन चंद्रपूर येथे आगमन होणार आहे. दिवसभर ते नियोजन भवन चंद्रपूर येथे कोरोना तसेच विविध विषयावर सभा घेणार आहेत. सकाळी 11 वाजता उद्योग मित्र समितीची सभा घेणार आहेत. दुपारी 12 वाजता जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती चंद्रपूरची आढावा बैठक  घेतील. दुपारी 2 वाजता चंद्रपूर जिल्हा कोविड-19 बाबत आढावा बैठक घेणार आहेत.

दुपारी 3 वाजता प्रलंबित वन हक्क दावे संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 4 वाजता वन विभाग आढावा बैठक ते घेतील. सायंकाळी 5 ते 6 वाजताचा वेळ राखीव असणार आहे. तर सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण करतील व कमलाई निवास रामदास पेठ नागपूर येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.