अवाढव्य वीजबिलविरोधात भाजपा मुल ग्रामीणच्या वतीने सोमवारी (१३ जुलै) उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन.

Bhairav Diwase
या मागणीसाठी येत्या १३ जुलैला भारतीय जनता पार्टी मुल तालुका (ग्रामीण) यांच्यावतीने महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आपले क्षोभ व्यक्त करत मा. उपविभागीय अधिकारी मुल यांचेकडे निवेदन.
Bhairav Diwase.    July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
चंद्रपूर:- कोरोणा सारख्या जागतिक महामारीच्या संकटात संपूर्ण देशभर टाळेबंदी घोषित करण्यात आलेली आहे. यात मागिल काही काळात संपूर्ण व्यवहार ठप्प असतांना वीज वितरण कंपनीने ग्राहकांकडे अवाढव्य वीज बिलाची मागणी केली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी आणि महाविकासआघाडी सरकारच्या अशा चुकीच्या धोरणांमुळे जनतेत सर्वत्र चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे आलेले वीज बिल संपूर्णतः माफ करावे. या मागणीसाठी येत्या १३ जुलैला भारतीय जनता पार्टी मुल तालुका (ग्रामीण) यांच्यावतीने महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आपले क्षोभ व्यक्त करत मा. उपविभागीय अधिकारी मुल यांचेकडे निवेदन देण्यात येणार आहे.
जून महिन्यात आलेले टाळेबंदी काळातील मार्च ते जून महिन्याचे वीज बील सरासरीपेक्षा जास्त दराने देऊन सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम वीज वितरण कंपनीद्वारे केले जात आहे. टाळेबंदीच्या काळात सर्वांच्या हातचे रोजगार बुडाल्याने सर्वसामान्य माणसासमोर जगण्या-मरण्याचा संघर्ष उभा ठाकला होता. याची जाणीव असून सुद्धा राज्य सरकार आणि सरकार संचालित महावितरण कंपनीने विजबीलाचे अंकेक्षण दर महिन्याचे वेगवेगळे केले नाही, तसेच वेगवेगळे बीलही दिले नाही. आणि आता तीन महिन्यानंतर सरसकट ढोबळ मानाने वाढीव व जास्त दराप्रमाणे बिल देवून सर्वसामान्यांवर अन्याय केला आहे. नागरिकांना होणार त्रास व दयनीय आर्थिक कोंडीला टाळण्यासाठी प्राप्त तीन महिन्यांचे वीज बील संपूर्णतः माफ करण्यात यावे. आणि सर्वसामान्यांची आर्थिक लूट थांबवावी. याकरिता भारतीय जनता पार्टी मुल तालुका ग्रामीणच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी मुल यांना सोमवारी निवेदन देण्यात येणार आहे. 
त्याकरिता जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाच्या मुल तालुकाध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, पं. स. सभापती चंदू मारगोणवार, उपसभापती घनश्यामजी जुमनाके, जि. प. सदस्य पृथ्वीराज अवताडे, शितल बांबोळे, पं. स. सदस्या पुजा डोहणे, वर्षा लोनबले, जयश्री वलकेवार, अमोल चुदरी, संजय येनुरकर, सुनिल आयलनवार, आनंद पा. ठिकरे, अमोल येलंकिवार, ईश्वर कोरडे, सुभाष बुक्कावार, वंदना आगरकाटे, दिलीप पाल, मंगेश मगनुरवार, बंडू नर्मलवार, मुकेश गेडाम, तुळशीराम कुंभारे, प्रशांत बांबोळे, राजु पोटे, फलिंद्र सातपुते, संतोष रेगुंडवार, सविता बोरूले, नामदेव खोब्रागडे, प्रमोद कडस्कर, विजय पाकमोडे, पत्रुजी दंडेवार, हरीभाऊ गोहणे, ताराबाई चांभारे, चंदू नामपल्लीवार, विवेक ठिकरे, उत्तम लेनगुरे, रामभाऊ मोहुर्ले, गनेश चौधरी, अरूण पाल, अजय शेंडे, सीताराम भांडेकर, प्रमोद कुंदावार, मुन्ना कोटगले, वासुदेव वाघ, विजय गुरनुले, मिथुन वाकुडकर, पुरुषोत्तम भुरसे, संगिता बुरांडे, साईनाथ बावणे, भुमेश गेडाम, गुलशन लाकडे, सचिन गुरनुले, आशु सिडाम, शुभम समर्थ यांनी केले आहे.