स्थानिकांना कामावरून काढण्याऱ्या अग्रवाल कंपनीला मनसेनी ठोकला ताला मनसेचे मनदिप रोडे यांचे आक्रमक आंदोलन.

Bhairav Diwase
0
मनसेच्या आंदोलनाने कंपनी व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली स्थानीकांवर अन्याय केल्यास यावे आणखी तिव्र आंदोलन करणाचा इशारा मनसे अग्रवाल व्यवस्थापनाला दिला.
Bhairav Diwase.    July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कंपनीद्वारे स्थानीकांना डावलून परप्रांतीयांना प्राधान्य स्थानीक शासकीय अधिकान्यांचे जाणुन बुजुन दुर्लक्ष, स्थानीक दहा कामगारांना कामावरून काढणाच्या व उर्वरित स्थानिकांना कामावरून कमी करून त्यांच्या जागेवर परप्रांतीय कामगार ठेवण्याचे प्रयत्न करणाऱ्या वरोरा येथील वणी बायपास रोड वरील अग्रवाल ग्लोबल इन्फ्रा प्रा. लि. या रस्ता बांधकाम कंपनीच्या व्यवस्थापनास सडेतोड जॉब विचारत मनसे नेते मनदिप रोडे यांनी कंपनी विरोधात आक्रमकपणे आंदोलन करीत कंपनीला कुलप ठोकले. मनसेच्या आंदोलनाने कंपनी व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली स्थानीकांवर अन्याय केल्यास यावे आणखी तिव्र आंदोलन करणाचा इशारा मनसे अग्रवाल व्यवस्थापनाला दिला आहे.
यावेळी आंदोलनात मनसे पदाधिकारी मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत झुंजारे, तालुका अध्यक्ष गौरव मेले, शहर सचिव सुमित करपे, मनविसे शहर अध्यक्ष आकाश ठावरी, मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, शहर उपाध्यक्ष कल्पक ढोरे, मिथुन महाकुलकर, नितिन बावणे व कंपनीतील कामगार उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)