Top News

ग्रामीण भागातील ऑटोरिक्षा चालू करा:- विदर्भ ऑटो रिक्षा चालक कामगार संघटना, चंद्रपूर च्या वतीने मागणी.

ग्रामीण भागातील ऑटोरिक्षा चालू करून महाराष्ट्र राज्यातील सर्व ऑटोरिक्षा चालकांना प्रत्येकी   आर्थिक १०,००० रुपये मदत देण्याचे विदर्भ ऑटो रिक्षा चालक कामगार संघटना, चंद्रपूर च्या वतीने मागणीचे निवेदन.
Bhairav Diwase.    July 10, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- वैश्विक महामारी असलेला कोरोना  हा जीवघेणा विषाणू असून त्यापासून देश आणि देशांतर्गत अनेक राज्य कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे गेल्या २० मार्च पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून समस्त गतिमान जीवनचक्र बंद पडले आहे. त्यात हातावर पोट असणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांची  मोठी दयनीय अवस्था झाली असून दोन वेळेच्या जेवणाचे हाल आणि हाल झाले आहे. त्यामुळे उपासमारीची परिस्थिती त्यांसमोर निर्माण झाली आहे.
          जीवनाचा गाळा चालविण्यासाठी बेरोजगार तरुण तसेच अनेक व्यक्ती ऑटोरिक्षा ला पसंती देत असून राज्यात यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बरेच व्यक्ती हे बँकेच्या फायनान्स वर ऑटोरिक्षा घेतले असून आपला उदरनिर्वाह करत आहेत परंतु सध्या देशात लॉकडाऊन घोषित असल्यामुळे संपूर्ण देशात तसेच राज्यात भारतीय फौजदारी दंडसंहितेच्या कलम १४४ नुसार जमावबंदी तसेच संचारबंदी असल्यामुळे समस्त राज्यात सरकारी तसेच खाजगी वाहतूक बंद असून ३० जून ला नवीन शासन परिपत्रकानुसार शहरी भागातील ऑटोला दोन प्रवासी घेऊन चालविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागातील ऑटिरिक्षा चालकांबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नसून त्यामुळे ग्रामीण भागातील ऑटोरिक्षा चालकांवर उपासमारीची बिकट परिस्थिती निर्माण झाली असून  बँकेकडून ऑटोसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी ?  जगावे की मरावे अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भ ऑटोरिक्षा चालक कामगार संघटना चंद्रपूर यांनी तहसीलदार साहेब सावली यांना ग्रामीण भागातील ऑटोरिक्षा चालू करून प्रत्येक ऑटोरिक्षा चालकांना १०,००० रुपये आर्थिक मदत देण्याचे मागणीचे निवेदन दिले.
      ग्रॉमीन ऑटो सघटना तालुका अध्यक्ष मोरोती दासलवार याचे सह आदिची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने