या घटनेचा जाहीर निषेध भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी शहराच्या वतीने करण्यात आला.
ब्रह्मपुरी:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक राजगृह निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्थ असून हे समाज विघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे व या मुळे समाजात अशांतता पसरविण्याचे हेतूने केलेले कृत्य अतिशय निषेधार्थ आहे या घटनेचा जाहीर निषेध भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी शहराच्या वतीने करण्यात आला.
राजगृहावर काही माथेफिरू समाजकंटकांनी हल्ला करून तोडफोड केली त्या इसमाची सखोल चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासंबंधी चे निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनातून मागणी भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरी च्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे निवेदन देताना युवा मोर्च्याचे अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, महामंत्री स्वप्नील अलगदेवे, रितेश दशमवार,सचिव दत्ता येरावार,उपाध्यक्ष प्रमोद बांगरे,पवन जैस्वाल,अरुण बनकर,सचिन मानगुदडे,रजत थेटे, हिरा मेश्राम आदी सहभागी होते.