Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 151 बाधित; एका बाधितांचा मृत्यू.

Bhairav Diwase

बाधितांची एकूण संख्या 11623.

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 8369 बाधितांना डिस्चार्ज.

उपचार सुरु असणारे बाधित 3074‌.

Bhairav Diwase. Oct 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 151 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 हजार 623 झाली आहे. यापैकी 8 हजार 369 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3074 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 24 तासामध्ये 1 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे