वडिलांच्या कार्याची मुलाकडुन दखल; नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे संस्कार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- लहान मूल म्हणजे मोठ्याव्यक्तीचे हुबेहुब अनुकरण करतात. मुळात लहान मुलांना मोठ्या व्यक्तीचे अनुकरण करण्याची जणूकाही सवयच झाली आहे. त्यामुळे बालवयातच आपण आई -वडील म्हणून किंवा कुटुंबातील मोठे व्यक्ति म्हणून बालमनावर कोणते संस्कार करतो ,त्यांच्यासमोर काय कार्य करतो यावर मुलांचे निरीक्षण असते. ते कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे मुलांच्या क्रुतीतून व्यक्त होते.
राजुरा येथील इन्फंट् जीजस इंग्लिश पब्लिक स्कूल मधे इयत्ता सहावी मधे शिकणारा एशान उमेश लढी. वडील शिक्षकी पेशात असून ते नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राजुरा शहर संघटक म्हणूनही सामाजिक कार्य करतात. आपल्या वडिलांचे व त्यांच्या सहकार्यांचे कार्य बघून एशानने व्रूक्षारोपन करून वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला. त्याने आपल्या परिसरातील प्राचीन असे सोमेश्वर मंदिर येथे आपल्या बालमित्रांनासोबत घेऊन व्रुक्षारोपन केले. यावेळी नेफडो चे विभाग सचिव बादल बेले यांनी एशान ला वाढदिवसानिमित्त भेटवस्तु देऊन त्याच्या या कार्याचे कौतुकही केले. उमेश लढी, आर्यन सुरेश लढी, दीपीका राजू देशमुख , रश्मि रामू देशमुख आदींची उपस्थिति होती. कोरोणासारख्या जागतिक संकटात मनात भीती न बाळगता पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाकरीता नेफडो चे कार्यकर्ते कार्यरत आहेत. आज सर्वांना ऑक्सिजन ची किंमत त्याचे महत्व कळायला लागले आहे. ऑक्सिजन अभावी हजारो नागरिकांचा जीव जात आहे. अश्यातच शासनाच्या नियमांचे पालन करीत संपूर्ण महाराष्ट्रत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्याची दखल एशान सारखे अनेक बालगोपाल विध्यार्थी घेत आहेत.


