प्रहार सेवक नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर.

Bhairav Diwase
नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी वं तलाठी यांच्यासोबत केली पाहणी.
Bhairav Diwase. Oct 22, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- मुसळधार वादळी पावसाने शेतकरी राज्याचे कंबरडे मोडले असून शेतकरी राजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशीच परिस्थिती सावली तालुक्यात सुद्धा आहे. सावली तालुक्यातील सायमारा येथील शेतकऱ्यांनी ही बाब प्रहार सेवक प्रफुल तुम्मे यांना सांगताच सावली येथील कृषी सहाय्यक अधिकारी तथा पेंढरी येथील तलाठी यांना माहिती देऊन नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची विनंती केली असता तात्काळ कृषी सहाय्यक अधिकारी तथा तलाठी यांनी लगेच सायमारा येथील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले.
हवालदिल झालेल्या शेतकरी राजाला पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची विनंती प्रहार सेवक प्रफुल तुम्मे यांनी केली. या वेळी उपस्थित प्रफुल तुम्मे, मधुकर ठिकरे उईके, सायमारा येथील पोलीस पाटील श्री लीलाधर मडावी उईके वं नुकसान झालेले शेतकरी उपस्थित होते.