चिमूर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी.

Bhairav Diwase
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.
Bhairav Diwase. Oct 22, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्रात अलीकडे झालेली अतिवृष्टी, परतीच्या पावसाने नुकसान आणि धान ,कापूस पिकांवर मावा तुडतुडा लष्करी अळीचा प्रादुर्भाव यामुळे रोगराई आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी करीत
       जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन दिले आहे . 
          चिमूर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात माहे आगस्ट ,सप्टेंबर 20 मध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर व अतिवृष्टी तसेच ऑक्टोबर मध्ये आलेला परतीचा पाऊस अश्या संकटांना शेतकरी सामना करीत आहे  
     शेतकऱ्यांच्या शेतातील आधी पेरण्यासाठी नुकसान नंतर उत्पन्नात आलेली घट आणि परतीच्या पावसाच्या विळख्यात सापडल्याने अत्यल्प उत्पन्न दिसत आहे
    चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर नागभीड व वैनगंगा नदीच्या किनारी असलेल्या ब्रम्हपुरी भागातील शेतीभागातील 
    प्रचंड नुकसान झालेले दिसत आहे शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळण्यास विलंब होत आहे 
    मागील दहा ते बारा दिवसापासून मावा तुडतुडा लष्करी अळी चा प्रादुर्भाव वाढल्याने धान कापूस पिकांचे पंचनामे करण्यास विलंब होत असल्याने नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे 
    शेतकऱ्यांच्या धान कापूस पिकांची पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात न जाता नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे