शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची अविनाश पाल यांची मागणी.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Oct 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी हे धान उत्पादक तालुके असून येथील मुख्य पीक हे धान आहे येथील शेतकरी फार मोठ्या प्रमाणात धनाचे उत्पादन घेत असून दर वर्षी निसर्गामुळे पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी हा दिवसेन दिवस हवालदिल होत चालला आहे तसेच या वर्षी सुद्धा वैंगंगा नदीला आलेल्या कृत्रिम रित्या पुर आल्यामुळे धान उत्पादक शेतकर्याीचे सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी या तालुक्यातील अनेक शेत्या वैनगंगा नदीला लागून असल्यामुळे येथील शेतकर्यायचे फार मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक सुद्धा कमी प्रमाणात होत आहे त्यामुळे व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्याची लूट होऊ नये यासाठी शासनाची धान खरेदी केंद्र प्रत्येक सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून करावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल व बोनसचा सुद्धा फायदा होईल. त्यामुळे शेतकर्यां ना नाहक त्रास होणार नाही व शेतकर्या ची आर्थिक लूट होऊ नये या करिता महाराष्ट्र सरकारने धान उत्पादक तालुक्यामध्ये प्रतेक सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी मा, ना. श्री. विजयभाऊ वड्डेटीवार मंत्री,मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा. व गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.