चंद्रपूर:- दिनांक ५/१२/२०२५ ते ९/१२/२०२५ पावेतो भंडारा जिल्हयातील पोलीस मैदानावर आयोजित नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२५ चा समारोप मंगळवार दिनांक ०९ डिसेंबर, २०२५ रोजी मोठया उत्साहात पार पडला.
भंडारा जिल्हयात आयोजित या नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२५ मध्ये नागपूर (ग्रामीण), भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्हयातील प्रत्येकी १४० खेळाडु अश्या एकुण ८४० खेळाडु पोलीसांनी सहभाग घेतला असुन सदर स्पर्धे मध्येच्या सांघिक क्रीडा प्रकारातील हॉकी, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो मध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस संघाने प्रथम व द्वितीय तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारातील वेटलिफ्टिंग, बॉक्सींग, कुस्ती, ओशो-तायकोंडो, पावर लिफ्टिंग प्रथम स्थान प्राप्त करुन "जनरल चॅम्पियनशिप” चा मानकरी ठरला.
चंद्रपूर जिल्हा पोलीस संघ सन २०१६ पासुन सात्तयाने परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत यावर्षी ११ व्या वेळी जनरल चॅम्पियनशिपचा मानकरी ठरत चंद्रपूर जिल्हयाचे नांव लौकिक करीत आहे.
नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२५ चे समापन कार्यक्रमात संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र नागपूर, अंकित गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र यांच्यासह हर्ष पोद्दार, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, नुरुल हसन, पोलीस अधीक्षक भंडारा, निलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, अनुराग जैन पोलीस अधीक्षक गोंदिया, गोरख भांबरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जनरल चॅम्पियनशिपची घोषणा झाली तेंव्हा मैदानावरील उपस्थित खेळाडुंनी जोरदार टाळया वाजवुन चंद्रपूर जिल्हा पोलीस संघाचे कौतुक केले.

