युवासेना तालुका प्रमुख हेमराजभाऊ बावणे यांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- आज दिनांक 15 ऑक्टोंबर रोज गुरुवार ग्रामपंचायतचे प्रशासक भानुसे साहेब यांना व मा. खासदार साहेब ,मा. आमदार साहेब ,मा. जिल्हाधिकारी साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिरे व प्रशासक घुग्घूस यांना हिंदवी स्वराज्याच्या आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारत देशाचे राजे होते ज्यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी सदैव संघर्ष करणारे न्यायप्रिय तत्वनिष्ठ असे एकमेव राजे होते अशा त्या राजाची कीर्ती सदैव स्मरणार्थ राहावी यासाठी घुग्घूस येथील जनतेची व शिवसेनेची फार जुनी मागणी आहे.
करिता सदर मागणीचा विचार करून घुग्घूस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात यावा या मागणीला घेऊन घुग्घुस येथील शिवसेना पदाधिकारी
श्री गणेशजी शेंडे शिवसेना उपतालुका प्रमुख , ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथजी धोंगडे, युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, शिवसेना शहर प्रमुख बंटीभाऊ घोरपडे, युवासेना शाखा घुग्घुसचे चेतन बोबडे, जेष्ठ नेते बाळुभाऊ चिकनकर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकरजी चिकनकर, अजय जोगी, योगेश भांदक्कर, महेश शेंडे, अमर कापटे, अमित बोबडे, हर्षल बजाईज,अजय राय, व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.