नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांची वर्णी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यात अवैध धंदे जोमाने वाढत आहे. अवैध धंदे चालक पोलिसांच्या युक्त्यावर भारी पडतांना दिसत आहे. सध्या पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून विलास यामावार यांची कारकीर्द जेमतेम ठीकच. यामावार यांची बदली रत्नागिरी येथे झाल्याने आता ही जबाबदारी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक हे जबाबदारी सांभाळणार आहे. विशेष म्हणजे पोलीस दलाच्या कारकिर्दीची सुरुवात नायक यांनी कोरपना तालुक्यातून केली होती.
वणी येथील नायक यांची कारकीर्द उत्तम आहे तशीच कारकीर्द कोरपना तालुक्यात राहणार कि नाही हे येणारा समोरचा काळच सांगणार.