किसान युवा क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, वरोरा तालुक्याची कार्यकारिणी गठित.

Bhairav Diwase
तालुका उपाध्यक्षपदी वैभव देवतळे, तालुका उपाध्यक्षपदी सुरज धोटे, तालुका प्रवक्तापदी अनिकेत भोयर यांची नियुक्ती.
Bhairav Diwase. Oct 14, 2020

वरोरा:- किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. यशवंत गोसावी साहेब यांच्या आदेशानुसार शुभमभाऊ कोहपरे तालुका अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली किसान युवा क्रांती संघटनेचे वरोरा तालुका उपाध्यक्षपदी वैभव देवतळे, तालुका उपाध्यक्षपदी सुरज धोटे, तालुका प्रवक्तापदी अनिकेत भोयर यांची नियुक्ती करण्यात आली. व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 

किसान युवा क्रांती संघटनेचे वरोरा तालुका उपाध्यक्ष वैभव देवतळे, तालुका उपाध्यक्ष सुरज धोटे, तालुका प्रवक्ता अनिकेत भोयर यांची नियुक्ती करण्यात आली. यांना आता श्री.यशवंत गोसावी (संस्थापक किसान युवा क्रांती संघटना) यांच्या नेतृत्वाखाली जात, धर्म, लिंगभेद, राजकीय पक्ष यांचा संघटनेमध्ये उल्लेख न करता कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून आपल्या क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचे प्रश्न, समस्या सोडविन्यासाठी कटिबद्ध रहावे लागणार आहे. समोर आलेल्या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी काय करणार यावर संपूर्ण क्षेत्राचे लक्ष लागुन असेल यात शंकाच नाही.