अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. किसान युवा क्रांती संघटनेची निवेदनाद्वारे मागणी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 14, 2020


वरोरा:- शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले असले तरी बँका मात्र पीक कर्ज वाटपास टाळाटाळ करीत आहेत. तसेच हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यात येत नाहीत त्याबरोबर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणीसाठी युवा क्रांती संघटनेच्यावतीने बुधवारी वरोरा तालुका तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.


        यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी डबघाईला आला आहे. या काळात शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज वाटप बाबत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी आदेश देऊन देखील बँका विविध तांत्रिक अडचणी दाखवून पीक कर्ज वाटपास करीत आहेत. तरी शेतकऱ्यांना विना विलंब पीक कर्ज उपलब्ध करून देण्यास आपल्या परिसरातील सर्व बँकांना आदेश द्यावेत. तसेच बाजार समित्यांमध्ये व बाजार समित्यान बाहेर व्यापारी शेतकऱ्यां कडून केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने शेत माल खरिदी करीत आहेत. या बाबत बाजार समित्या व व्यापारी यांना हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात यावेत.अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक काढले तरी अद्यापर्यंत पंचनामे झाले नाहीत. 

         त्यामुळे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. दि.१४ ऑक्टोंबर रोजी या मागण्यांचे निवेदन वरोरा तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी किसान युवा क्रांती संघटनेचे वरोरा तालुकाध्यक्ष शुभम कोहपरे, तालुका उपाध्यक्ष वैभव देवतळे, तालुका उपाध्यक्ष सुरज धोटे, तालुका प्रवक्ता अनिकेत भोयर, अमन खांडेकर, किशोरजी चौधरी सचिव विचार विकास संस्था वरोरा तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.



वरोरा तालुका, शहर व ग्रामीण प्रतिनिधी निवडणे आहे. इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.