उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचेकडे केली प्रत्यक्ष भेटून केली निवेदनाद्वारे मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्राच्या चिमूर तालुक्यासह शेजारील भाग वऱ्हाडच्या भौगोलिक सीमेवरचा भाग असून शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकास प्राधान्य देतात. एकट्या चिमूर तालुक्यात २८००० (अठ्ठावीस हजार)हेक्टर पेक्षा अधिकची लागवड नोंदवीलेली असून शेजारील तालुक्यातसुद्धा कापूस या नगदी पिकाची लागवड कोरोना महामारीत हवालदील शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्य शासनाच्या अलीकडील जाहीर कापूस धोरण व प्रसिद्ध वृत्तपत्राच्या बतम्या आणी संबंधित अधिकारी यांच्या चर्चेवरून निदर्शनास येत आहे की कापूस खरेदीशी संबंधित यंत्रणेत कर्मचारी यांची अपुरी संख्या विचारात घेऊन पुर्वीपेक्षा निम्मे खरेदी केंद्र सुरू केल्या जाण्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे चिमूर तालुक्यातील पूर्वीपासून सुरू कापूस खरेदी केंद्र नामंजूर होण्याची शक्यता असल्याने परिसरातील कापूस पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई होईल .
चिमूर क्षेत्रात उष्ण देर्जाचा पिकविण्यात आलेला कापूस विक्रीसाठी सुमारे १०० की.मी. प्रवास करून विक्रीसाठी केंद्रावर न्यावा लागत असल्याने स्थानिक व्यापारी यांचेकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने तत्कालीन शासनाने चिमुर तालुक्यातील भिसी येथे कापूस खरेदी केंद्र मंजूर केले.
भिसी येथे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेले कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने परिसरात कधी नव्हते एवढे २८ हजार पेक्षा अधिक चिमूर तालुक्यातील शेतजमिनीवर कापूस पेरण्या झाल्या असून परिसरात वरोरा,नागभीड,शिंदेवाही, ब्रम्हपुरी,भिवापूर तालुक्यात कोरोना स्थितीत मार्ग काढूत शेतकऱ्यांनी अन्य पिके न घेता मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केल्याचे निदर्शनास येत आहे.शासनाने चिमूर तालुक्यातील भिसी येथील कापूस खरेदी केंद्र बंद केल्यास पुन्हा शेतकरी आजूबाजूच्या १०० किमी पेक्षा अधिकचे प्रवासाचे अंतर टाळताना व्यापाऱ्यांकडून लुबाडणूक होऊन शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शासनाच्या विषयी द्वेष भावना निर्माण होईल.
या सर्व बाबींची गंभीररीत्या दखल घेत चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी मुंबई मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली भेटीदरम्यान पणन व सहकार उपस्थित असून त्यांचेसोबत चर्चा करून भिसी येथील कापूस खरेदी केंद्र बंद होणार नाही पूर्वत सुरूच राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना दिला.