चिंतामणी महाविद्यालयात "वाचन प्रेरणा दिवस" साजरा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
 चंद्रपूर:- चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूरद्वारा संचालित चिंतामणी महाविद्यालय घुगुस जि. चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि संस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 ऑक्टोबर 2020 रोज गुरुवार भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस" वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर कुंभारे यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर कुंभारे यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.तर वाचन प्रेरणा दिवस का घेण्यात येतो व का साजरा करण्यात येतो असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रवी धारपवार यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व असून विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा आहे. तसेच डॉ.अब्दुल कलाम यांचे जीवन म्हणजे सर्वसामान्य माणसांना प्रेरणा देणारे एक सुंदर विश्वविद्यालय आहे, असे त्यांनी प्रतिपादित केले. तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा महेंद्र कुंभारे यांनी केले तर आभार डॉ. नितीन कावडकर यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य केले.