बलात्कार पिडीत मुलीवर चंद्रपूर शहरातील जेटपुरा गेट जवळ अनोळखी ईसमाचा प्राणघातक हल्ला?

Bhairav Diwase
रयतवारी भागातील गणेश ट्रेडिंग किराणा दुकानात काम करत असलेल्या मुलीवर मालकाच्या मुलांने (उत्तम धृवप्रसाद गुप्ता) यांनी केला होता बलात्कार,
Bhairav Diwase. Oct 16, 2020

चंद्रपूर:- रयतवारी भागातील गणेश ट्रेडिंग किराणा दुकानात काम करत असलेल्या एका 23 वर्षीय मुलीवर दुकान मालक उत्तम धृवप्रसाद गुप्ता यांनी रात्रीच्या वेळेस आपल्या राहत्या घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना काही दिवसापूर्वी लॉक डाऊन च्या काळात घडली असून आरोपी उत्तम धृवप्रसाद गुप्ता हा अटकेत आहे व त्याला जामीन मिळावा म्हणून अनेक राजकीय व इतरांकडून दबाव पोलिसांवर टाकल्या जात आहे.

हेही वाचा:- किराणा दुकानात काम करत असतांना, घरी जाण्यास झाला ऊशिर. 


 शिवाय मुलीला तिची तक्रार मागे घेण्यात यावी यासाठी लाखो रुपयाची ऑफर सुद्धा आरोपीच्या वडिलांकडून मुलीला येत असताना ती मुलगी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यामुळेच तिच्यावर गुंडा कडून हत्त्या करण्याचा कट रचला जात असल्याचे चित्र असून चंद्रपूर शहरातील जेटपुरा गेट जवळ बलात्कार पिडीत मुलीवर हल्ला करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. घटनास्थळी असलेल्या व्यक्तींनी सांगितले की पीडित मुलीला मारण्यासाठी भरधाव वेगाने दुचाकीस्वार आले व तिच्यावर हल्ला करण्यास हात ऊगारणार एवढ्यात त्या मुलीने झटका मारून ती दूर झाली, या घटनेची तक्रार पिडीत मुलीने रामनगर पोलीस स्टेशन मधे दिली असून आरोपीच्या वडिलांनी किंव्हा इतरांनी पिडीत मुलीवर हल्ला करण्याची सुपारी तर दिली नसावी ? असा संशय येत आहे,