शहरातील प्रभाग क्रमांक 13 गुरुदेव वॉर्डातील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमुर:- शहरातील प्रभाग क्रमांक 13 गुरुदेव वॉर्ड येथील हरणे यांच्या घरच्या विहिरीत पडून रवींद्र हेमनाथ हिंगनावे मृत्यू झाला. मंदिराची रंगरंगोटी करताना तोल गेल्यामुळे विहिरीत पडून मृत्यू झाला मृतकाचे नाव रवींद्र हेमनाथ हिंगनावे (वय 35) शेळगाव सोनेगाव येथील असलेला रवींद्र हेंगणावे हा हरणे यांच्या घरी कुटुंबासह भाड्याने राहत होता. उद्यापासून नवरात्र सुरू होत असल्यामुळे भवानी मातेचा मंदिराची रंगरंगोटी करण्यासाठी मंदिराचा भिंतीवरती चढून रंगरंगोटी करत असताना तोल गेल्याने मंदिराला लागून असलेल्या विहिरीत तोल जहून पडला.
रवींद्र निनावे चिमूर जवळच्या शेंडेगाव -सोनेगावचा असून चिमूर येथील हरणे यांच्या घरी आपल्या कुटूंबा सह किरायाने राहत होता . तो मजुरी काम करीत होता . आज दि १६ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वा सुमारास नवरात्र निमित्ताने भवानी मातेचे मंदीरची रंगरंगोटी करण्यासाठी मंदिराच्या भिंतीवर चढला असता काम करताना तेव्हा त्याचा तोल गेल्याने विहिरीत पडला. आरडाओरड करण्यात आली परंतु मदतकार्य पोहचण्यापूर्वी त्याचा विहिरीत मृत्यू झाला. तो विहिरीत पडल्यानंतर परिसरात घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच चिमूर पोलीसनी घटनास्थळावर पोचून पंचनामा केला.
शवविच्छेदनाचा करिता चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.पुढील तपास पोलीस निरीक्षक अलीम शेख करीत आहे मृतक रवींद्र च्या मागे आई पत्नी 2 मुले असा आप्त परिवार आहे