(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोविड-19 अंतर्गत येऊ घातलेल्या नवरात्र, दसरा व दिवाळी यानिमित्त समीक्षा करण्यासाठी पोलीस स्टेशन राजुरा येथे शांतता समितीचे आयोजन दि.15/10/2020 रोजी करण्यात आले. या सभेला नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. विजय सरनाईक व ठाणेदार श्री. नरेंद्र कोसुरकर यांनी संबोधित केले.
राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच मंडळांना देवीची प्रतिष्ठापना करता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी 4 फूट तर घरगुती ठिकाणी 2 फूट मूर्ती ठेवण्याचे बंधन आहे. नवरात्र व दसरा या सणांकरिता कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, जेवणावळी, नृत्य, गरबा, बँडपथक, डिजेवर परवानगी नाकारण्यात आली असून मूर्ती स्थापनेसाठी वापरण्यात येणाऱ्या जागेची ( सरकारी किंवा खाजगी) ऐन. ओ. सी घेणे आवश्यक राहील. सार्वजनिक मंडळांनी न.प. च्या रस्त्यावर पेंडाल टाकू नये तसेच विसर्जन करतांना पाच इसमाच्या वर जमा होऊ नये. अश्या सूचना देण्यात आल्या. या शांतता समिती सभेत उपपोलिस निरीक्षक श्री सुनील झुरमुरे, श्री प्रशांत साखरे समिती सदस्य डॉ. उमाकांत धोटे, न. प. कक्ष अधिकारी विजय जांबुळकर, श्री बबन उरकुडे तथा सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन प्रवीण डवरे व कोराम यांनी केले.