किसान युवा क्रांती संघटनेचे वरोरा तालुका अध्यक्ष शुभम कोहपरे यांचा बातमी द्वारे सरकारला इशारा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 16, 2020
वरोरा:- कोरोना महामारीच संकट सुरु आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही, या वर्षीच्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या सोयाबिन, धान, कापसाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील शेतकरी गजानन भोयर या शेतकऱ्यांने आपल्या २ एकर शेतात सोयाबिनची पेरणी केली होती. त्या शेतकऱ्यांने सोयाबिनची काढणी केली असता. २ एकरात त्या शेतकऱ्याला १ क्विंटल सोयाबिन झाले, मगं या शेतकऱ्याने काय करावे कुणाला मदत मागावी. या शेतकऱ्यांचा लावलेला खर्च सुद्धा निघाला नाही.

     मग अश्या वेळी शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय? म्हणुन माझी सरकारला विनंती आहे की, प्रत्येक शेतात जाऊन पंचनामे करुन लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी. अन्यथा शेतकऱ्यांन कडुन मतदानाच्या वेळी मतांची अपेक्षा करु नये. जर लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर युवा किसान क्रांती संघटने तर्फे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा किसान युवा क्रांती संघटनेचे वरोरा तालुका अध्यक्ष शुभम कोहपरे यांनी बातमी द्वारे दिला आहे.