शिवसेना शहरप्रमुख बंटीभाऊ घोरपडे यांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- घुग्घुस परिसरातील महात्मा गांधी चौक, पंचशील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लाँयड्स मेटल कंपनी परिसरात मोठ्या प्रमानात मोकाट कुत्र्यांचा, डुकरांचा रोगट गाई व म्हशी मुक्त पणे वावरतात व रस्त्यावरच ठाण मांडुन बसतात त्यामुळे रात्रीदरम्यान अपघात घडतात मोकाट कुत्र्यांचा हौदोस सुरु असतो.
अश्या मोकाट कुत्र्यांचे लसिकरण करण्यात यावे मोकाट गाई म्हशींना कोंडवाड्यात टाकण्यात यावे. आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास घुग्घुस ग्रामपंचायत कार्यालयात मोकाट जनावरे सोडण्यात येईल असा इशारा प्रशासकास निवेदन देऊन केली आहे.
निवेदन देतांना घुग्घुस शिवसेना शहरप्रमुख बंटीभाऊ घोरपडे, युवासेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे, शिवसेना नेते बाळुभाऊ चिकनकर, रघुनाथभाऊ घोंगळे, गणेश शेंडे, युवासेना नेते चेतन बोबडे व कार्यकर्ते उपस्थित होते.