प्रहारचे बिडकर यांनी सोमवार पर्यन्त लिंक सुरु न झाल्यास बँकेला कुलूप लावण्याचा दिला होता इशारा.
एस बी आय चंद्रपुर चे हेड सीसीर पटनाईक साहेबांनी एक तासाच्या आत सुरु करुन दिली लिंक.
कोरपना:- शेतकऱ्यांना कुठं कधी कोणता त्रास होईल हे काही सांगता येत नाही शेतीचा हंगाम कापूस सोयाबीन साठी लावलेले मजूर त्यांना द्यासाठी मजुरीला लागणारे पैसे यासाठी दिवस रात्र मरमर करणे, हेच त्यांच्या नशिबी येतात.
अशीच एक घटना कवठाळा येथील भारतीय स्टेट बँक येथील भोंगळ कारभार समोर आला चार दिवसा पासून लिंक फेल होती या मुळे शेतकऱ्यांचे रोज दिवस भर बँके समोर बसून आपली रोजी रोटी बुडवा लागे यावर बँक कर्मचाऱ्यांचा मुजोरी व अरेवारी चवट्यावर आलेली असताना बँकेची चार दिवसापासून लिंक फेल दाखवने शेतकऱ्यांसाठी डोके दुःखी ठरली अशातच एका शेतकऱ्याने प्रहार चे सतिश बिडकर यांना या समस्यांची माहिती दिली तसेच बिडकर यांनी भारतीय स्टेट बँक चंद्रपुर हेड ऑफिस ला फोन केला सम्बधित अधिकाऱ्यांशी या बाबत माहिती घेतली व आज लिंक सुरु न झाल्यास सोमवरला शेतकऱ्यांना घेऊन बँकेला टाळे लावू असा सज्जळ दम त्या अधिकाऱ्याला दिला त्यांनी लगेच लिंक सुरु करण्याचे आश्वासन दिले लगेच एक तासाच्या आत अधिकाऱ्यांचा फोन आला की लिंक सुरु करण्यात आली व काही अडचण आल्यास कळवा त्यानंतर काही वेळात शेतकऱ्यांचा फोन आला की आपन केलेल्या सहकार्याने बँकेची लिंक चार दिवसापासून बंद असलेली एक तासाच्या आत सुरु करण्यात आली त्या बद्दल शेतकऱ्यांनी प्रहारचे आभार मानले