(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील अनेक खेड्या गावालगत मागील काही दिवसांपासून वाघाची दहशत वाढत चालली आहे. त्यामुळे गावातील लोकांना शेतात कामासाठी जाणे सुद्धा जीव गमावण्या इतपत झाले आहे. या नरभक्षी वाघाची दहशत या परिसरात खूप वाढली आहे.
या पिसाळलेल्या दहशती वाघाद्वारे आज दि. 16 ऑक्टोबर 2020 रोजी शुक्रवारला वाघाने मानोली येथील रहिवासी रमेश महादेव अडवे यांच्या गायींवर हल्ला करून गायीला जखमी केले. सात गायी हे गोवरी कॉलनी येथील नाल्याजवळ असतांना ही घटना घडल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये त्यांच्यापैकी एक गाय ही वाघाच्या तावडीतून सुटका करून गंभीर अवस्थेत घरी पोहचली. आणि एकूण सहा गायींचा काहीच पत्ता दिसत नाही आहे. ते सहा गायींचा शोध गावकरी करीत असून अजूनपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे रमेश महादेव अडवे यांची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन वनविभागाने लवकरात लवकर नरभक्षी वाघाचे बंदोबस्त करून गावकऱ्यांना दहशतीतून बाहेर काढावे.