Top News

वाढीव वीज बिलाबाबत राज्यपालांना निवदेन; शरद पवारांशी बोला, राज्यपालांचा राज ठाकरे यांना सल्ला.

Bhairav Diwase. Oct 30, 2020

मुंबईः- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिलं. राज ठाकरेंनी राज्यपालांशी वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली. आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या भेटीदरम्यान राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा सल्लाही दिला आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी शरद पवार यांच्याशी बोलेन. फोनवरुन बोलेन किंवा प्रत्यक्ष भेटून बोलेन. वेळ पडल्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेईन.

लॉकडाऊनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. म्हणून राज्यपालांशी बोलण्यासाठी आलो, असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना कोणताही विषय सांगितला तर त्यावर काम सुरु आहे. काम सुरु आहे, पण निर्णय व्हावा. त्यामुळे लोकांची भावना पाहता सरकारने एक-दोन दिवसात निर्णय घ्यावा, अशी विनंती आहे. पुढे त्यांच्याशी बोलणार आहे. राज्यपालही बोलणार त्यांच्याशी बोलणार आहेत. मात्र सरकार आणि राज्यपालांमधील सख्य पाहता हा विषय किती पुढे जाईल याची मला कल्पना नाही. राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल सरकारशी बोलतील, असंही ते म्हणालेत.

वाढीव बिलाबाबत निवेदन.

वीज बिलांचा विषय मनसेनं लावून धरला आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आलं. अदानी, बेस्टची लोकं भेटली. आम्ही बिल कमी करु शकतो मात्र एनईआरसी कमी करावा लागेल. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते सांगतात. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. याविषयी राज्य सरकारलाही माहिती आहे. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्याच संदर्भात पहिलं निवदेन राज्यपालांना भेटून दिलं असल्याचं, राज ठाकरे म्हणालेत. विषय खूप आहेत पण सरकारने निर्णय घ्यायला हवेत. आपल्याकडे प्रश्नांची कमतरता नाही, कमतरता आहे ती फक्त निर्णय घेण्याची असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने