Top News

बिबटच्या हल्यात महिला ठार.


चामोर्शी तालुक्यातील ठाकुरनगर येथील घटना.
 Bhairav Diwase. Oct 30, 2020
 (आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस आसमवार चामोर्शा 
 चामोर्शी:- घोट येथून जवळच असलेल्या ठाकुरनगर येथे आज पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान माया जगदीश हलदार वय वर्ष ५६ ही महिला आपल्या अंगणात निघाली असता, अंगणात असलेल्या केळीच्या झाडात दडून बसलेला वाघाने हल्ला करून त्या महिलेस ठार केल्याची घटना घडली आहे.


          घटनेची माहिती मिळताच वनविभाग घोट येथील acf पवार साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी गोदाने साहेब, धानोरकर साहेब, आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व मोका पंचनामा करण्यात आला त्या नंतर मृतक महिलेला शवविच्छेदनात करिता दवाखान्यात पाठविण्यात आले.
          
      या वेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांनी सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. व या अपघातात मृत्यू परिवारास तात्काळ मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
        या वेळी त्यांच्यासह भाजपचे बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शाहा, दिलीप चलाख,विकास मैत्र, दिलीप हलदार,अम्लीन्दू बिस्वास, प्रदीप मंडल आदी पधादीकारी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने