जनगणनेमध्ये आदिवासींसाठी धर्मकोडचा कॉलम द्या:- अखिल भारतीय विकास परिषद शाखा सावली तर्फे राष्ट्रपतीकडे मागणी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- भारतात २०२१ ला होणाऱ्या जनगणनेत आदिवासींना आदिवासी धर्मकोड क्र.७ असा कॉलम देण्यात यावा. जेणेकरून भारतातील संपूर्ण आदिवासी जमातीची संख्या, त्यांचे अधिकार व सामाजिक न्याय मिळण्यासाठी उपयोगी पडेल, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीच्या सावली शाखेच्या वतीने देशाच्या राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. आदिवासी विकास परिषदेच्या अनेक शाखांकडून या मागणीला घेऊन देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात येत आहे. आदिवासींना २०२१ च्या जनगणनेत आदिवासी धर्मकोड ७ देण्याची मागणी संपूर्ण भारतभर सुरू आहे. सावलीचे तहसीलदार परिक्षीत पाटील यांना निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अतुल कोडापे यांच्या नेतृत्वात अ.भा. आदिवासी विकास परिषदेचे सावली तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम, उत्तम गेडाम, लखन मेश्राम, राजेंद्र पेंदाम, ज्ञानेश्वर मेश्राम आदी उपस्थित होते.