रोशनभाऊ पचारे जिल्हाअध्यक्ष किसान काँग्रेस कमेटी, चंद्रपूर यांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- ताडाली एमआयडीसी ग्रोथ सेंटर येथील सिद्धबली इस्पात कंपनीत काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका कामगारांचा मृत्यु झाला व दोन कामगार गंभीर जखमी झाले.
सिद्धबली इस्पात कंपनी हि मागील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होती. काही महिण्यापुर्वी हि कंपनी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कंपनीचे संयत्र जिर्ण अवस्थेत आहे.
त्यामुळे घडलेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यु व दोन कामगार गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची चौकशी करण्यात यावी, कामगारांना न्याय देण्यात यावा, कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, कामगारांना भविष्य निधीची सुट्टी, शासकीय नियमानुसार सुविधा देण्यात येत नाही. कामगारांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी कंपनीची चौकशी करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी चंद्रपूर चे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
निवेदन देतांना दिनेश चोखारे सभापती क्रूउबास चंद्रपूर, रोशन पचारे किसान काँग्रेस जिल्हाअध्यक्ष चंद्रपूर, नागेश बोंडे कार्याध्यक्ष काँग्रेस चंद्रपूर, पवन आगदारी जिल्हाअध्यक्ष एससी सेल काँग्रेस चंद्रपूर, प्रेमानंद जोगी ग्रापं सदस्य उसगांव, काँग्रेस नेते प्रशांत सारोकर, हितेश लोढे, गणेश आवारी, चंदु मारने, रमेश बुच्चे, अनिल नरुले, सचिन गोगला व अंकेश मडावी उपस्थित होते.