(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- वर्धा नदीच्या चिंचोली रेती घाटावरून रेती भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरनी म्हातारदेवी कडून मोल मजुरी करून येणाऱ्या मालवाहतूक ऑटोला घुग्गुस रस्त्यावर सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान धडक दिली असता ऑटो पलटी होऊन शेतातून येणाऱ्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचाराकरिता येथील कोल्हे खाजगी दवाखान्यात पाठविण्यात आले. हि माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सचिन बोरकर व महेश मांढरे यांनी घटनास्थळी जाऊन ट्रँक्टर ला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावले आहे. वृत्त लिहे पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.