(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- सध्या धान पिकांची कापणी होत असून दिवाळीच्या आत मळणी होऊन शेतकऱ्यांच्या हाती धानाचे उत्पन्न होणार आहे परंतू शासकीय आधारभूत केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नसल्याने शासकीय आधारभूत केंद्र प्रत्येक सहकारी संस्थेत सुरू करण्याची मागणी भाजपचे प्रदेश सदस्य डॉ श्यामजी हटवादे यांनी केली आहे
चिमूर तालुक्यातील धान पिकांची कापणी सुरू झालेली असून दिवाळी पूर्वी धान कापणी पूर्ण होणार असून मळणी झाल्यावर उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती मिळणार आहे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होऊ नये म्हणून
व योग्य भाव मिळावा आणि गळचेपी होऊ नये यासाठी शासनाने चिमूर तालुक्यातील प्रत्येक सहकारी संस्थेत शासकीय आधारभूत केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी भाजपचे प्रदेश सदस्य डॉ श्यामजी हटवादे यांनी केली असून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनासुद्धा निवेदन देणार असल्याचे सांगितले.