शिव संकल्प सामाजिक बहुउद्देशीय संस्था बाबूपेठच्या माध्यमातून रक्तदान शिबिर संपन्न.

Bhairav Diwase
तरुणांनी राक्तदानास समोर यावे:- जि.प सदस्य ब्रिजभूषण पाझारे
Bhairav Diwase. Oct 17, 2020


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर
चंद्रपूर:- रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्व श्रेष्ठदान असे समजले जाते. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्तपेठी मधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुशंघाने तरुणाई मध्ये रक्तदानाचे महत्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने शिव संकल्प सामाजिक बहूउद्देशीय संस्थेच्या विद्यमान रक्तदान शिबिराचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ बाबूपेठ येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमात श्री. आकाश ठुसे संस्थेचे अध्यक्ष यांनी रक्तदान हि आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येत असतात. आणि अश्यातच कोरोनाच्या महामारीत सुद्धा योग्य दक्षता घेऊन या रक्त दानाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सर्व सदस्यांनी कुठलीही भीती न बाळगता संस्थेचा उद्देश आणि रक्तदानाच्या संकल्पित कार्य पूर्ण केले आहे. रक्तदात्यांचे मनपूर्वक अभिनंद त्यांनी आपल्या शब्दातून प्रकट केले. 
 नवरात्रीच्या आजच्या शुभपर्वावर ६५ सदस्यांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीच्या हात मिळावा या अनुशघाणे आयोजित रक्तदान शिबीर हे खरोखर गर्वाची बाब आहे व तरुनाच्या राक्तदानास समोर येण्याच्या त्यांचा कार्याची करावी तेवढी प्रशंसा कमीच आहे. असे यावेळी जि.प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी प्रतिपादन केले. 
  सदर आयोजित कार्यक्रमात श्री. अशोक आक्केवार, राजू ठाकरे, सचिन मुळे, शंकर चौधरी, सुनील लीपटे, गिरीश कोल्हे, हर्शल मुळे, प्रतिक उराडे, जय बद्द्लवार, सौ.पोर्णिमा शेळकर, प्राशिल ढोले, केशव मल्लिक, पंकज शेलेकर, निच्शय जवादे, प्रदीप चक्रवती, संगम शेलकर, खेमराज भलवे, सचिन संदुरकर, आदी सदस्य उपस्थित होते.