(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा ते हैदराबाद कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली असल्याने तात्काळ दुरुस्त करण्यात असे मागणीचे पत्र राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी राष्ट्रीय महामार्ग मुख्य अभियंता यांना 22 सप्टेंबर रोजी पाठविले परंतु पत्राची या विभागाने दखल घेतलीच नसावी असेच चित्र दिसून येत आहे
राजुरा ते तेलगणात हैदराबाद कडे जाणाऱ्या रस्ता पूर्णता उखडला आहे यामार्गाने जाताना नरकाचा मार्ग अनुभव नागरिक घेत आहे बर्याचदा या रस्त्यामुळे अपघाताचे घटना सुद्धा घडले आहे या मार्गाचे चौपदरी करण होणार आहे परन्तु प्रत्यक्ष काम सुरु व्हायला आणखी बराच वेळ आहे तोपर्यत तरी रस्त्याची डागडुजी करून वाहने योग्य रीतीने चालविता येईल असे कारावे अशी जनतेची ओरड सुरु आहे
दरम्यान राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता यांना पत्र पाठवुन तात्काळ या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आज या पत्राचे कालावधीला एक महिना होत आहे परंतु या विभागाने या पत्राची गंभीर पने दखल घेतलीच नाही म्हणूनच अजून हि रस्ता दुरुस्ती केली जात नाही आहे
आमदारांचे पत्र, आणि जनतेच्या त्रासाकडे या विभागाने दुर्लक्ष केल्याने वाहनधारकाना मात्र या रस्त्यावरून वाहन चालविताना तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागत आहे.