Top News

पणन महासंघाची कापूस खरेदी चिमूर ला होणार.


आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नाला आले यश.
Bhairav Diwase. Oct 29, 2020
(संग्रहित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- केंद्र शासनाने कापुस खरेदीसाठी सब एजंट म्हणून पणन महासंघास परवानगी दिलेली आहे परंतु चिमूर तालुक्यात कापूस उत्पादक असल्याने चिमूर येथे पणन महासंघाचे केंद्र उघडण्यास परवानगी नव्हती तेव्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी प्रयत्न करीत चिमूर येथे पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र उघडण्याच्या प्रयत्नाला यश आले आहे. 
        खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होऊ नये त्यासाठी पणन महासंघ शासकीय योग्य दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते . चिमूर तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठया प्रमाणात असल्याने चिमूर येथे पणन महासंघाचे केंद्र असणे आवश्यक आहे . परंतु पणन महासंघाचे चिमूर केंद्र नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दखल घेत पणन महासंघाशी पत्रव्यवहार करीत यवतमाळ जिल्ह्यातील वणी झोनशी चिमूर येथे पणन महासंघाचे केंद्र ची परवानगी मिळविण्यात त्यांना यश आलेले आहे .  
    नागपूर जिल्ह्यात उमरेड व भिवापूर येथे हे कापूस खरेदी केंद्र सुरू होते.
    त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा राजूरा व चंद्रपूर येथे कापूस खरेदी केंद्र सुरू होते . परंतु गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही कापूस खरेदी केंद्र लागवडी अभावी सुरू करण्यात आलेले नव्हते.
    शासन व कापूस खरेदी महामंडळास आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी संपूर्ण भौगोलिक परिस्थिती लक्षात आणून दिली.
चंद्रपूर-गडचिरोली आणि नागपूरचा हा गोसेखुर्द परिसराशी जोडलेला सुपीक भाग व कापूस उत्पादनास योग्य वातावरणाची दखल घ्यावी अशी विनंती केली.
मागील वर्षी चिमूर तालुक्यात भीसी येथे कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवल्याने परिसरातील बरेच शेतकरी कापूस पेरणीकडे मोठ्या प्रमाणात वळलेले आहेत हे सुद्धा निदर्शनास आणून दिले.
          संपूर्ण भागांमध्ये फक्त एकमेव कापूस खरेदी केंद्र चिमूर येथे असल्यामुळे व मागील वर्षी उत्तमरीत्या कार्यरत असलेला विठल रुखमाई जिनिंग व प्रेसिंग भिसी कापूस खरेदी केंद्र म्हणून महामंडळ यांचे निदर्शनास आले होते.
          केंद्रात कोणतीही तक्रार नसल्याने हे केंद्र यावेळेस महामंडळाकडे अपुऱ्या कर्मचारी मुळे बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली होती.
          आमदार बंटीभाऊ हेच हेरून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंभिरपणे उभे राहीले..
या केंद्राचा व्याप आता गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर व भंडारा जिल्ह्यातल्या भागाशी व तेथील कापूस उत्पादक शेतकरी आणि कापूस खरेदीशी येणार आहे.

दूरदृष्टी असावी आमदार बंटीभाऊ भांगडिया सारखी*. 

   
 आमदार बंटीभाऊ भांगडीया हे फक्त निवेदन करून थांबले नाही तर प्रत्यक्ष. मंत्रीमहोदयांस सविस्तर समजावून सांगत विश्वासात घेतले. सरकारर हे आधी जनतेचे, शेतकऱ्यांचे, कैवाऱ्याचे, मग तो पक्ष कोणताही असो.!
              
विशेष लक्ष घालून जिथे कर्मचारी व अधिकारी ग्रेडर यांची कमतरता असताना कापूस खरेदी केंद्रात असताना बंद करण्याची वेळ कापूस खरेदी महामंडळावर येत होती . तेव्हा नावारूपास आलेले केंद्र बंद पडू नये यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी किमायच केली .
              चिमूर येथे कापूस खरेदी केंद्र अद्ययावत चालू ठेवण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला व हे केंद्र व्यवस्थित सुरू राहील यासाठी कर्मचाऱ्यांची तात्काळ नियुक्ती सुद्धा करवून घेतली.
     ''आमदार बंटी भांगडिया यांनी पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचे विशेषता मनःपूर्वक आभार मानले, महामंडळाचे अध्यक्ष श्री. अनंत देशमुख यांचे सुद्धा आभार मानले, 
     ग्रामीण भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ न दिल्यामुळे प्रशासनाचे सुद्धा आभार मानले".

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने