(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- दया, शांती, सामजिक सलोखा यांची शिकवण देणारे हजरत मोहम्मद पैगम्बर यांच्या जन्मदिवस औचित्या साधुन हज़रत टीपू सुल्तान फाउंडेशन राजुरा तर्फे शहरात विविध कार्यक्रम राबवण्यात आले.
शहरातील न्यू एरा इंग्लीश स्कूल परिसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम रबिवण्यात आले. तसेच शहरातील बेघर वस्ती, सोनिया नगर,इंदिरा नगर परिसरातील गरजू लोकांना शॉल वितरण करण्यात आले. राजुरा शहरातील वाहतूक पोलीस दला सोबत शहरातील विवेकानंद आश्रम शाळा राजुरा येथील मुलांना मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी हज़रत टीपू सुल्तान फाउंडेशन राजुरा चे सर्व सैनिक उपस्थित होते.