मुस्लिम बांधवांकडून जशने ए ईद ए मिलाद च्या पावन पर्वावर रक्तदान व ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- जशने ए ईद ए मिलाद (मोहम्मद पैगंबर साहब जयंती ) निमित्य 30 ऑक्टोंबर ला विविध कार्यक्रम राबवण्यात आले
मानवतेचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जन्मदिवस म्हणजे ईद-ए-मिलादुन्नबी दरवर्षी या दिवशी संपूर्ण जगभरात खूप आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतात पण कोरोनाविषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वार्षिक सणाला घरीच राहून साजरा करण्याचा निश्चित केला आहे कोरोणा च्या दुष्काळात रक्ताचा तुटवडा पाहून समस्त गडचांदूर मुस्लिम समाज व युवा मुस्लिम कमिटी गडचांदूर तर्फे हे सोशल डिस्टंसिंग ला लक्षात घेऊन सर्वधर्मीय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले होते यात 55 रक्तदात्यांनी रक्तदान करून ईद च्या शुभेच्छा दिल्या त्याच प्रमाणे गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात तेथील रुग्णांना फळ वाटप करून विविध कार्यक्रम घेऊन मुस्लिम समाज ईद-ए-मिलादुन्नबी हा सण साजरा केला.
सामाजिक सलोखा जपत जनहितासाठी व कोणालाही कोरोना काळात रक्ताचा तुटवडा पडू नये या दृष्टीने गडचांडूर शहरातील मुस्लिम बंधूंनी समाजहितासाठी फार मोल्ल्यवान काम केले आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचे कौतुक ऐकण्यात मिळत आहे. दर वर्षी कोणते ना कोणते सामाजिक कार्यक्रम राबवून हिंदू मुस्लिम एकात्मिता गडचांदूर शहरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते
रक्तदान करून कुणाचा तरी जीव वाचतो व हे पुण्य काम आपल्या हातून घडत आहेत या पेक्षा मोठं काय पाहिजे असे मत इशाद ( राजू )कादरी यांनी मांडले.