(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- घुग्घुस येथील काँग्रेस ट्रान्सपोर्ट युनियनच्या पदाधिका-यांनी शुक्रवारला रात्री दरम्यान ट्रँक्टर धारकांना अडवून पैशाच्या मागणी साठी मारहाण केली व ट्रँक्टरच्या काचा फोडल्या व पैश्याचे चलन ही फाडले तिन ते चार ट्रँक्टर धारकांना मारहाण केल्याची घटना नकोडा येथे घडली.
आज शनिवारला सकाळी संतप्त ट्रँक्टर धारकांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी केली.
परंतु एका सत्ताधारी पक्षाच्या शहर अध्यक्षाच्या मध्यस्थीने त्यांच्या कार्यालयात समझोता झाल्याने ट्रँक्टर धारकांनी घुग्घुस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केला नाही.
या घटनेची शाही वगळत नाही तोच आजच शनिवारला दुपारी भरदिवसा बसस्थानक चौकात १० ते १५ च्या संखेत घुग्घुस काँग्रेस ट्रान्सपोर्ट युनियनच्या पदाधिका-यांनी चार चाकी वाहने तिथे येऊन एका युवकास मारहाण केली व तिथुन पळ काढला हि माहिती मिळताच घुग्घुस गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्रुत्त लिहे पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.