(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- आज गुरुवारी सायंकाळी महसुल विभागाने वर्धा नदीच्या घाटावर धाड टाकुन अवैध रेतीची तस्करी करनारे चार ट्रँक्टर जप्त करून नायब तहसिलदार कार्यालय, घुग्गुस येथे लावण्यात आले आहे.
महसुल विभागाच्या वतीने रेती तस्करांच्या मुस्क्या आवळण्यासाठी सतत कारवाही सुरु आहे. परंतु तशी च रेती तस्करांची मुजोरी ही कायमच आहे.
जप्त करण्यात आलेल्या चार ट्रँक्टर धारकांकडुन दंड वसूल करण्यात येणार आहे.