Click Here...👇👇👇

आधार न्यूज नेटवर्क'ला प्रकाशित केलेल्या बातमीची व प्रहार सेवकांच्या मागणीची विद्युत प्रशासनाकडून घेतली दखल.

Bhairav Diwase
2 minute read

अवघ्या ०२ दिवसात विद्युत प्रशासनानी जळालेल ट्रांसफार्मर दिले बदलवून; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.

Bhairav Diwase.    Oct 12, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:-
सावली तालुक्यातील लोंढोली येथे दीड महिन्याअगोदर ट्रांसफार्मर जळाल्याने पाच एकर शेतीतील पिक मरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. किशोर गुरुदेव सातपुते यांच्या शेतातील पिक दरवर्षी कमी होत असल्यामुळे शेतात मोटार बसवून विज जोडणी केली. पण म्हणतात ना, ईश्वर पण पहायला लागला की हातातील सरस निघुन जातो. असाच प्रकार यावर्षी शेतकऱ्यांच्या बाबतीत यावर्षी दिसतो. कोरोनामुळे लॉकडाउन आणि त्यामुळे अनेकांचे मजुरीचे काम बंद, शेती केली तर कधी वेळेवर पाणी नाही, शेतीची रोवनी चांगली असता पुराचा फटका तर पिक गर्भात असतांना पाणी नाही, आणि रोगाचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांना तोंड देत शेतकरी खचून चालला आहे. आता तोंडघाशी आलेला पिक मरतांना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. २४ ऑगस्ट ला शेतातील ट्रांसफार्मर जळाले याची माहिती विद्युत विभागाला देण्यात आली. पण एक महीना लोटूनहि ट्रांसफार्मर न लागल्यामुळे हातातील पिक मरतांना पहावे लागत आहे.विजवितरण कर्मचारी यांना फोन केल्यास दिशाभूल करीत दोन दिवस म्हणत, दीड महीना लोटून गेला पण अजूनही ट्रांसफार्मर लावून देण्याचे काम करीत नाही. आणि आता शेतकऱ्यांने फोन केल्यास जेव्हा येईल तेव्हा लावून देऊ ही भाषा वापरित असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.

*दीड महिन्यापासून ट्रांसफार्मर जळाल्यामुळे पाच एकर शेतीच पाण्याविना नुकसान.* http://www.adharnewsnetwork.com/2020/10/blog-post_257.html?m=1

*व्हिडीओ न्युज पहा.*


         सावली तालुक्यातील लोंढोली येथे दीड महिन्याअगोदर ट्रांसफार्मर जळाल्याने पाच एकर शेतीतील पिक मरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. हि बातमी "आधार न्यूज नेटवर्क" या न्युज पोर्टला 09 ऑक्टोंबरला बातमी प्रकाशित केलेली होती. शेतकऱ्यांनी तोंडी तक्रार दिल्या नंतरही दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी. या दोन दिवसात ट्रांसफार्मर न लावून दिल्यास विद्युत कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार व प्रफुल तुम्मे यांनी दिला होता. याची दखल घेत विद्युत प्रशासनानी अवघ्या २ दिवसांमध्ये जळालेल ट्रांसफार्मर बदलून दिले आहे. किशोर गुरुदेव सातपुते शेतकऱ्यांनी आधार न्यूज नेटवर्क व प्रहार सेवक चे आभार मानले.


      मी सतत मागील एक महिन्यापासून व्याहाड येथील विद्युत ऑफिसमध्ये नविन ट्रांसफार्मर लावून देण्याची मागणी केली. पण चार पाच दिवसांनी ट्रांसफार्मर येईल असे सांगत होते. आणि याच आशेवर मला ठेवण्यात आले होतेे. आज दीड महीना लोटून गेला त्यामुळे माझी शेती पाण्याविणा मरत होती. नंतर "आधार न्यूज नेटवर्क" च्या सावली प्रतिनिधींनीशी संपर्क साधून सर्व माहिती दिली असता. आधार न्यूज नेटवर्क या न्युज पोर्टला बातमी प्रकाशित केली. व  प्रहार सेवकांनी ०२ दिवसात ट्रांसफार्मर न‌ लावल्यास विद्युत केंद्रा समोर आंदोलन करु असा इशारा दिला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. अवघ्या ०२ दिवसात विद्युत प्रशासनानी ट्रांसफार्मर लावून दिले असून मी आता माझ्या शेतीला पाणी करू शकत आहे.
किशोर गुरुदेव सातपुते
शेतकरी